शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये; सावंतांचा राजनाथसिंगांना टोला


वेब टीम : मुंबई
ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे.

मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का?

असा प्रश्न विचारत अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं.

तुम्ही परवा बिहारचा बिगुल वाजवला आणि 70 हजार एलईडी लावून प्रचार सुरु केला.

त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नये.

ही राजकारणाची वेळ नसल्याचं सांगत पीएम केअर फंडाचं काय झालं, असा सवाल शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी विचारला आहे.

माननीय राजनाथसिंग आम्हाला सर्वांना आदरणीय आहेत.

त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही.

पण मुळात ते शिवसेनेवर बोलतात तेव्हा दुःख होतं.

तेव्हा स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे.

शिवसेनेने आयुष्यात कोणाला धोका दिला नाही.

शिवसेनेला अनेक लोकांनी धोका दिलाय.

शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, अस म्हणत अरविंद सावंत यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post