महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची ठाकरे सरकारवर नाराजी...


वेब टीम : मुंबई
महाविकास आघाडीचे सरकार असतानाही काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याबद्दल काँग्रेसने पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आघाडीत काही प्रश्न नक्कीच असून,

सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसलाही स्थान मिळाले पाहिजे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससह मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांच्या हातात सगळी सूत्रे आहेत.

धोरणात्मक निर्णय घेताना, महत्त्वाच्या पदांवर अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार काँग्रेसकडून सातत्याने सुरू आहे.

बुधवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक झाली होती.

गुरुवारी पुन्हा काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची नाराजी प्रथमच उघड केली.

राज्याच्या काही प्रश्नांवर आम्ही एकत्र येऊन चर्चा केली. चक्रीवादळाच्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवरही गेले होते.

सरकार म्हणूनसुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. आमच्या व्यक्तिगत नव्हे तर जनहिताच्या काही मागण्या आहेत. त्यासंदर्भात चर्चा झाली पाहिजे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post