अहमदनगर : १४ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १०९ जण परतले घरी

file photo

वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी  १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

त्यांना शनिवारी (दि.६) दुपारी बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये राहाता तालुक्यातील ५, अकोले तालुक्यातील २, संगमनेर तालुक्यातील ३ तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post