अहमदनगर : जिल्ह्यात नव्याने 9 जण कोरोना बाधित


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात शनिवारी (दि.6) सकाळी नव्याने 9 जण कोरोना बाधित आढळले आहेत,

त्यात नगर शहरातील माळीवाडा येथील 1,कोठी येथील 2, शेवगाव -2,पाथर्डी – 2, राहता – 1 व संगमनेर येथील 1 जणांचा समावेश आहे.


जिल्हयात आढळलेले कोरोना बाधित

अहमदनगर शहर – 3 : स्टेशन रोड येथील 71 वर्षीय पुरुष, कोठी येथील 13 वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित.

पाथर्डी – 2:
चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेली 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना कोरोनाची लागण.

राहाता – 1:
राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.

संगमनेर – 1 :
संगमनेर शहरातील 40 वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.

शेवगांव – 2 : चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आलेला 27 वर्षीय युवक बाधित.

कळवा ( ठाणे)  येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती बाधित.

तर तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post