अहमदनगर : ओढणीने गळा दाबून खून करत मृतदेह टाकला काटवनात...


वेब टीम : अहमदनगर
येथील निंबळक शिवारात 35 वर्षीय अनोळखी महिलेचा कोणीतरी ओढणीने गळा आवळुन खुन केला.

ही घटना निंबळक बायपासच्या कडेला असलेल्या काटवनात घडल्याचे आढळुन आले.

याबाबतची माहिती अशी की, निंबळक बायपासलगत असलेल्या काटवनात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळुन आला.

मृत महिलेच्या गळ्यावर आवळल्याच्या खुना असल्याने सदर महिलेचा खुन झाला असल्याची एमआयडीसी पोलिसांनी प्राथमिक अंदाज केला.

सदर महिलेस मारून तिचे प्रेत ओढ्याच्या कडेला आणुन खड्ड्यात टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळी पाहणी करताना आढळुन आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post