उद्योगजगताला दिलेल्या सवलतींचा परिणाम लागला दिसायला... उत्पादन सुरु


वेब टीम : दिल्ली
लॉकडाऊनच्या तिसर्‍या फेजमध्ये उद्योग जगतासाठी दिल्या गेलेल्या सवलती आणि सुविधा यांचा परिणाम आता दिसू लागला आहे.

अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांची शोरूम उघडली आहेत

हरियानातील मानेसर येथील मारुती सुझुकी कारखान्यात 12 मे पासून उत्पादन सुरु केले जात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

मारुती सुझुकी व्यवस्थापनाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार सरकारच्या सर्व आदेशांचे काटेखोर पालन करून आणि कर्मचारी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन कारखाना पुन्हा सुरु केला जात आहे.

मारुतीने त्यांची 600 शोरूम उघडली असून तेथील मागणी पाहून त्याप्रमाणे उत्पादन केले जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post