रात्रीच्या अंधारात चीनचा तिबेटमध्ये युद्ध सराव; भारताला दिली युद्धाची धमकी


वेब टीम : बीजिंग
सीमेवर अधून-मधून खोडी काढणारा आणि लडाखच्या गलवान खोर्‍यात व पेंगोंग शोच्या भागात कारगिलप्रमाणेच हजारोंच्या संख्येने सैन्य उभे करणार्‍या चीनने आता भारतास थेट युद्धाची धमकी दिली आहे.

अमेरिका आणि आपल्यात सुरू असलेल्या शीतयुद्धापासून दूर रहा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दोन दिवसांपूर्वीदेखील चीनने दिली होती.

त्यावर, अमेरिकेने शेजारील राष्ट्रांना धमकावणे सोडा, अशा शब्दांत चीनला खडसावले होते.

याउपरही, चीनचा मस्तवालपणा सुरूच आहे.

आता थेट युद्धाची भाषा देताना लडाख म्हणजे डोकलाम नव्हे; आमच्या सैन्याने भारताबरोबर उंच ठिकाणांवरही लढण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे वृत्त चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोब्ल टाइम्सने दिले आहे.


डोकलाम घटनेनंतर चीनने सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत.

युद्धाच्यावेळी उंच ठिकाणांवर लढताना त्याचा फायदा होईल, असेही म्हटले आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडने अलीकडेच रात्रीच्या अंधारात उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याचा सराव केला.

शत्रूच्या प्रदेशात घुसखोरीचा युद्धाभ्यास करण्यासाठी त्यांनी 4700 मीटर उंचीवर सैन्य पाठवले होते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत युद्ध लढण्याच्या आपल्या क्षमतेची त्यांनी चाचणी घेतली.

नेमका किती तारखेला हा युद्ध सराव झाला त्याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

पण रात्री एकच्या सुमारास तिबेट मिलिट्री कमांडच्या युनिटने तांगगुला पर्वतरांगांमध्ये हा युद्ध सराव केला.

या युद्धसरावामध्ये चीनने ड्रोन विमानांमधून बॉम्बफेकही केली, असे वृत्त आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post