चिन्यांची मुजोरी कायम... 'या' भागातील सैन्य जसेच्या तसे...

file photo

वेब टीम : दिल्ली
चीनने तीन ठिकाणांवरुन सैन्य मागे घेतले असले तरी पँगाँग सरोवर भागात चिनी सैन्य कायम आहे.

दरम्यान, उभय देशात लवकरच चर्चेची आणखी एक फेरी पार पडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये लडाखमधील सीमा वादावरुन तणाव निर्माण झाला आहे.

यानंतर दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत चर्चेतून प्रश्न सोडविण्यावर एकमत झाले.

त्यानंतर चीनने लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे हटले.

तसेच चिनी सैन्याने त्यांची वाहनेही मागे घेतली.

तीन ठिकाणांहून चीनने सैन्य मागे घेतले असले तरी पँगाँग सरोवर भागात चिनी सैन्य कायम आहेत.

हाच भाग संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दोन्ही बाजूंकडून तिथे कुठलीही हालचाल झालेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post