भारतात ‘कोरोना’चा समूह संसर्ग अटळ; तज्ज्ञांचा इशारा


वेब टीम : दिल्ली
देशातील लॉकडाऊन उद्यापासून शिथील ‘अनलॉक १’ करण्याची तयारी सुरु असतानाच देशातील काही प्रमुख डॉक्टरांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

सरकारने कोविड १९ ची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही.

त्यामुळे देशात ‘कोरोना’चा समूह संसर्ग (community transmission) होणे अटळ असल्याचा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.

‘कोरोना’ची संपूर्ण परिस्थिती हाताळताना सरकारने साथरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताला विशेष किंमत दिली नाही.

त्यामुळे भारतातील ‘कोरोना’चे संकट नियंत्रणात येईल, ही अपेक्षा अवाजवी आहे.

उलट समाजातील अनेक स्तरांवर आणि लोकसंख्येत ‘समूह संसर्ग’ होणे जवळपास निश्चित आहे, असे या डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमिलॉजिस्ट या संस्थांनी संयुक्तपणे हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post