दुःखद .... राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू...


वेब टीम : ठाणे
कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे महापालिकेअंतर्गत येणार्‍या कळवा विभागातील नगरसेवक मुकुंद केणी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते.

14 दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं.

नगरसेवक कोणी एका कोरोना रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

दोन दिवसांनी त्यांनाही करोनाची लक्षणं जाणवू लागली.

यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं.

त्यांना डायबेटिस तसंच इतर काही त्रास असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post