महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ...मुसळधार पावसाचा इशारा


वेब टीम : दिल्ली
अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 

त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ३ जूनपर्यंत गुजरातची किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने अरबी समुद्रासाठी रविवारी दुहेरी दाबाचा अलर्ट जारी केला. 

खात्यानुसार, अरबी समुद्रात २ वादळे आकार घेत असून १ आफ्रिकी किनारपट्टीलगतच्या समुद्रावर आहे. 

ते ओमान आणि येमेनकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरे वादळ भारताच्या निकट आहे. 

ते पुढील २४ तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. 

पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post