राज्यात गणेशोत्सव साजरा होणारच... पण...


वेब टीम : मुंबई
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा उत्सव मानला जातो. हा उत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला आहे.

मात्र सध्या कोरोनाच्या संकटाने गणेशोत्सव नेमका कसा साजरा होईल या संदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

सर्व गणेशभक्तांचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते.राज्य सरकारने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारकडून यासंदर्भात सूचना दिल्या असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचे सांगितले.

सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी सूचना दिल्या.

गणेश मंडळांनीही यासाठी तयारी दर्शवली असून राज्य सरकार देईल तो आदेश आपण मान्य करणार असून कोणताही अडथळा आणणार नाही असे आश्वासन दिले.

सरकारचा निर्णय येण्या आधीच मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या बरोबरच आगमन सोहळेही रद्द केले आहेत.मुंबईतील प्रसिद्ध चिंतामणी गणेश मंडळाने आगमन सोहळा रद्द केला असून मंडपातच गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post