गोपीचंद पडळकर नगर जिल्ह्यात आल्यास तोंडाला काळे फासणार


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करून अहमदनगर जिल्ह्यात त्याना रस्त्यावर फिरू देणार नाही, जिल्हात आल्यास त्याना काळे फासू असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले आहे.

आज भाजपच्या असभ्य संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन गोपीचंद पडळकरांच्या वाचाळ वक्तव्याचा माध्यमातून झालेले दिसते.

नुकतीच भाजपने त्याना विधानपरिषदेवर संधी दिली तिथे चांगले काम करणे अपेक्षित असताना भाजपच्या संस्कृतीप्रमाणे आपण देवेंद्र फडणवीस यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहात.

देशाचे नेते व महाराष्ट्राचे सर्वेसर्वा आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांवर आक्षेपार्ह विधान केले आहे, स्वतःचे कुठलेही कर्तुत्व नसलेल्या गोपीचंद पडळकर याने सूर्यावर थुंकल्यास तोच थुंकी स्वत:पडल्यासारखी आहे.


पडळकरांनी आपण कोणावर बोलतोय, आपली लायकी काय, आपण बोलतोय काय?  आपले वय काय याचे भान ठेवले पाहिये. स्वत: त्यांनी मानसोपचार तज्ञाकडे तपासणी करुन घ्यावी कारण त्यांचा मानसिक तोल ढासळलेला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात भोळ्याभाबड्या धनगर समाजातील जनतेला बिरोबाची शपथ घातली, माझा "बा" जरी भाजपाकडून उभा राहिला तरी, त्याला मत द्यायचं नाही, असं आपण जाहीरपणे व्यक्तव्य केले

लोकांना बिरोबाची शपथ खाऊ घालुन स्वतः मात्र भाजपा गुलाम झाले आहात. स्वतः आपण विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून निवडणूक लढवित होते परंतु आदरणीय अजितदादा पवार यांनी अक्षरशहा "चारी मुंड्या चीत करत" १  लाख ८० हजार मतांनी धूळ चारली.

गोपीचंद पडळकर याचा आरोप म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. राजकीय क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकाने टिप्पणी करताना आपली लायकी काय, आपण बोलतो काय? याचे भान ठेवले पाहिजे.

आदरणीय पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे पण म्हणून कोणीही काहीही बोलत असेल तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्यांना नगर जिल्ह्यात रस्त्यावर फिरू देणार नाही असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्पष्ट केले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post