'हे' छोटे- छोटे उपाय करून राखता येईल डोळ्यांचे आरोग्य...


वेब टीम : मुंबई
दूध, दही, गायीचे तूप, बकरीचे दूध यासारख्या पदार्थांचा आहारात नियमित समावेश असला, तर डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते.

मधाबरोबर आवळ्याचा ज्यूस घेणे उपयोगी ठरते.

ढोबळी मिरची, कोबी, भोपळा, टोमॅटो, पालक, आंबे, पपई, पेरू, संत्री, मोसंबी या फळे आणि भाज्यांपासून डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अनेक घटकांचा पुरवठा शरीराला होत असतो.

पंधरा ते वीस मिनिटांकरिता कोरफडीचा रस कापसाद्वारे डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याची आग होणे थांबते.

एरंड तेलाचे पाच थेंब घेऊन ते डोळ्याभोवतीच्या भागाला लावल्यास डोळे चुरचुरणे थांबते.

बदाम तेलाचा एक थेंब घेऊन तो डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या भागास लावल्यास डोळ्याभोवतीची त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

शांत झोप मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्रिफळाच्या सहाय्याने दररोज डोळे धुणे हा चांगला उपाय आहे.

यासाठी एक चमचा त्रिफळा चुर्णाचा वापर करावा.

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना शुद्ध गायीच्या तुपाचे एक-दोन थेंब नाकात सोडा.

या उपचारामुळे आपली द‍ृष्टी चांगली राहण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य बिघडण्यास आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे, नियमित मद्य सेवन करणे, अतिगोड पदार्थ खाणे, उडदापासून बनवलेल्या पदार्थांचे अतिसेवन करणे, यामुळे डोळ्यांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

त्याचबरोबर आपला आहार संतुलित नसला, तर त्याचाही परिणाम द‍ृष्टी क्षमता कमी होण्यात होतो.

पोट साफ नसेल, तरीही डोळ्यांचे कार्य व्यवस्थित चालू शकत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post