पाय सुजत आहेत...? व्हेरीकोस व्हेन्सचा असू शकतो त्रास.... असा करा उपाय...


वेब टीम : मुंबई
फार काळ एकाच जागेवर बसल्याने व्हेरिकोस व्हेन्स होण्याची शक्यता आहे.

एका जागेवर बसणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

एकाच जागी बसल्याणे शरीराची चरबी वाढते, त्याचबरोबर व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास सुद्धा वाढतो. त्यामुळे शरीराची होणे गरजेचे आहे.

काही लोकांच्या कामाच्या स्थळावर त्यांना एकाच जागी उभे राहण्याची गरज असते.

एकाच जागी उभे राहिल्याने पायांवर ताण येतो. एकाच जागी उभे राहण्यापेक्षा थोडा थोडा वेळ हलचाल करा.

मिठाचा अति वापर केल्यास व्हेरिकोस व्हेन्स उद्भवण्याची शक्यता असते.

रोजच्या आहारात मिठाचा वापर कमी केल्याने व्हेरिकोस व्हेन्सचा होण्याची शक्यता कमी असते.

मिठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा त्रास रक्त वाहिन्यांना होतो.

सकाळी फिरायला जाणे योग्य. रोज किमान अर्धा तास फिरा.त्यामुळे पायांच्या नसा मजबूत होतील.

फायबरयुक्त आहाराचा समावेश करा. मैदा, फास्ट फूड खाणे शक्यतो टाळा.

झोपताना पाय उंचावर ठेवा. यामुळे व्हेरीकोज व्हेंन्स विकसित होणार नाही

द्राक्षाच्या बीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाने मालिश करा.

व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबत तेलांच्या  मदतीने मसाजदेखील करणंही फायदेशीर ठरते.

नियमित मसाज वरून खालच्या दिशेला केला जातो.

पण व्हेरिकोस व्हेन्सच्या त्रासामध्ये तेलाचा मसाज खालून वरच्या दिशेला केला जातो.

यामुळे रक्तप्रवाहाचे बिघडलेले कार्य पुन्हा कार्यान्वित होण्यास मदत होते सोबतच व्हॉल्व्सला पुन्हा बळकटी येते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post