पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा


वेब टीम : पुणे
नैऋत्य मोसमी पाऊस गुरुवारी तळकोकणात दाखल झाला.मान्सूनने गुरुवारी (दि.११ जून) कोकणातील हर्णे ते मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली आहे.

येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून,

शुक्रवार(दि.१२), शनिवार (दि.१३), व रविवारी (दि.१४) अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अहमदनगर, धुळे,नंदुरबार,नाशिक, जळगाव तसेच पुणे जिल्ह्यतील घाट परिसरात येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

या अंदाजानुसार अहमदनगर शहर परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारनंतर पावसाला सुरवात झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान अहमदनगर शहरासह जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे.

जिल्हयात गेल्या ११ दिवसात सुमारे १५१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या वर्षीच्या पावसाच्या हंगामातील सरासरी २०.९६ टक्के पाऊस गेल्या ११ दिवसातच बरसला असल्याने पाऊस या वर्षी सरासरी गाठेल असा अंदाज व्यक्त होवू लागला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post