भारत-चीन सीमारेषेवर तणाव कायम; दोन्ही बाजूने सैन्य, शस्रांची जमवाजमव सुरु...


वेब टीम : दिल्ली
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर दोन्ही बाजूंनी लष्कर आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव करणे सुरू आहे.

दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान सैन्य आणि कूटनीती स्तरावर चर्चा सुरू आहेत.

दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपली ताकद वाढवत आहेत.

यात शस्त्रे, रणगाडे, आर्टिलरी गन, अवजड वाहने इत्यादींचा समावेश आहे.

हवाई दलाच्याही हालचाली सुरू आहेत. ५ मेपासून दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांसमोर उभे आहेत.

चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसून पँगाँग सो आणि गालवान खोऱ्यात कॅम्प  बनवण्यास सुरुवात केली.

भारतीय सैन्याने याला विरोध दर्शवत चीनच्या सैन्याला तातडीने मागे हटण्यास सांगितले.

चीनने डेमचोक आणि दौल बेग ओल्डीमध्येही सैन्याची संख्या वाढवली आहे.

चीनने पँगाँग सो आणि गलवान खोऱ्यात २५०० सैनिक तैनात केले आहेत.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सैन्याला चीनचे डावपेच माहीत आहेत.

शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले होते की, चीनसोबत लष्करी आणि डिप्लोमॅटिक या दोनही स्तरांवर चर्चा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post