खुशखबर ... देशातील सव्वा लाख कोरोनाबाधित झाले ठणठणीत...


वेब टीम : दिल्ली
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2,66,598 वर पोहोचली आहे.

मागच्या चोवीस तासांत 9,987 नवे रुग्ण सापडले.

तर, 331 रुग्णांचा मृत्यू झाला.

देशात सध्या 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तर, 1,29,214 रुग्ण बरे झाले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.47 टक्क्यांवर पोहोचले आहे.

अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि इंग्लंडनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

देशात आतापर्यंत 7,466 जणांचा मृत्यू झाला आहे.

एकट्या महाराष्ट्रात 3,169 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात काल तब्बल 331 बळी गेले.

यामध्ये महाराष्ट्रातील 109, दिल्लीतील 62, गुजरात 31, तामिळनाडू 17, हरयाना 11, पश्चिम बंगाल 9, उत्तर प्रदेश 8, राजस्तान 6, जम्मू-काश्मीर 4, कर्नाटक 3, मध्य प्रदेश आणि पंजाब प्रत्येकी 2, बिहार आणि केरळ प्रत्येकी एकाचा मृत्यू समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post