राज्यात २५६० नवीन कोरोना रुग्ण; १२२ जणांचा मृत्यू


वेब टीम : मुंबई
संपूर्ण राज्याचे लक्ष निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाकडे लागलेले असताना गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 2560 नवे रुग्ण आढळून आले असून 122 लोकांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे कोरोनाबधितांची संख्या पाऊण लाखाच्या घरात पोचली असून मृतांची संख्याही 2587 झाली आहे.

सव्वादोन महिन्यांचे लॉकडाउन संपून आता अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झालेला असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव त्याच वेगाने सुरू आहे.

गेल्या आठवड्यापासून रोज अडीच हजाराहून अधिक रुग्णांची भर पडत आहे.

कालही राज्यात 2560 नवे रुग्ण आढळले. तर 996 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

राज्यातील कोरोनाबधितांची संख्या 74,860 झाली असून यातील 32,329 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 39,935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल मृत्यू झालेल्या 122 रुग्णांपैकी 49 रुग्ण मुंबईतील आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post