निसर्ग चक्रीवादळ : मायानगरीच्या मुंबईकरांना दिलासा... पण...


वेब टीम : मुंबई
’निसर्ग’ चक्रीवादळाची दिशा बदलल्याने सद्य:स्थितीत मुंबईत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता कमी असल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.

चक्रीवादळ मुंबईला पोहचण्याची शक्यता कमी आहे.

सध्याच्या वाऱ्याची दिशा पाहता मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल.

मात्र चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहचणार नाही.

वादळ पेणकडून ठाण्याकडे पुढे सरकेल, अशी स्कायमेटने माहिती दिली आहे.

चक्रीवादळ जेव्हा मुंबई-ठाण्यातून जाईल तेव्हा जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी इतका असेल, असेही ते म्हणाले होते.

मात्र सुदैवाने मुंबईवरचा चक्रीवादळाचा धोका टळला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post