महागाईत पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा भडका....


वेब टीम : दिल्ली
सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.

मंगळवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत 47 पैशांची तर डिझेलच्या दरात 57 पैशांनी वाढ करण्यात आली.

यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर 76.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 75.19 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत.

गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

यापूर्वी सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

सोमवारी पेट्रोलच्या दरात 48 पैसे तर डिझेलच्या दरात 59 पैशांची वाढ करण्यात आली होती.

त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 83.62 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 73.75 रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर 80.37 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 73.17 रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर 78.55 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 70.84 रुपये प्रति लिटर झाले आहेत.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो.

तसेच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post