दहशतवाद्यांना करायचे अर्थपुरवठा... पोलिसांनी रॅकेट केले उध्वस्त...


वेब टीम : कुपवाडा
जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांना अर्थसहाय्य करणारे मोठे रॅकेट पोलिसांनी गुरुवारी उद्ध्वस्त केले.

लष्कर-ए-तोयबाच्या ३ एजंटाना अटक केली.

त्यांची नावे इफ्तिकार इंद्राबी, मोमीन पीर आणि इक्बाल अस्लम आहेत.

या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची रक्कम आणि अमली पदार्थांचा साठा जप्त केला.

अटक करण्यात आलेले हे ३ एजंट पाकिस्तानमधील लष्करच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते,

अशी माहिती, हंदवाडाचे पोलीस अधिक्षक डॉ. जी. व्ही. संदीप चक्रवर्ती यांनी दिली.

पोलिसांनी २१ किलो हेरॉईन आणि १.३४ कोटी रुपये जप्त केले आहेत.

हे रॅकेट जम्मू-काश्मीर भागात अमली पदार्थ विकून लष्करच्या अतिरेक्यांना अर्थसहाय्य करत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post