संजय राऊत म्हणाले, मोदीजींच्या निर्णयाला सर्व पक्ष पाठिंबा देतील, पण....


वेब टीम : मुंबई
सीमेवर जे काही घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी वा राहुल गांधी यांना जबाबदार धरू शकत नाही.

२० जवान शहीद झाले, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत.

पंतप्रधान जो काही निर्णय घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील;

पण चुकीचं काय झालं हे त्यांनी देशातील जनतेला सांगायला हवं.” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

भारत-चीन यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला आहे.

सोमवारी रात्री दोन्ही सैन्य दलांमध्ये चकमक घडली असून यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत.

या घटनेचे देशभरात पडसाद उमटले असून सर्व स्तरांवरून संताप व्यक्त केला जात आहे.

सीमेवर घडलेल्या घटनेविषयी बोलताना संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post