चीनवर आता ऑस्ट्रेलियानेही वटारले डोळे; म्हणाला, धमक्यांना घाबरणार नाही...


वेब टीम : मेलबॉर्न
सध्या चीनचे बऱ्याच देशांशी वैर डोके वर काढत आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियामध्येही तणावाचे वातावरण आहे.

तसेच चीनने ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीवर बरेच निर्बंध लादून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहे.

चीनच्या कोणत्याही धमक्यांना घाबरणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये होत असलेल्या निर्यातीवर निर्बंध लावण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले.

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या प्रसाराचा आंतरराष्ट्रीय तपास करण्याची मागणी अमेरिका आणि युरोपीयन देशांनी केली होती.

ऑस्ट्रेलियानेही याला समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर चीननं ऑस्ट्रेलियावर गरळ ओकत त्यांची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न केली होती.

चीनच्या शिक्षण मंत्रालयानेदेखील मंगळवारी ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता.

बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडूही ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा होता.

बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाला वर्षाला २६ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळतो.

चीनच्या या धमकीमुळे ऑस्ट्रेलियातील शिक्षण क्षेत्राकडून होणाऱ्या कमाईवरही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया खुल्या बाजाराचं समर्थन करतो. परंतु धमकी कोणत्याही ठिकाणाहून येवो

आम्ही आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड करणार नाही, अशी प्रतिक्रिया मॉरिसन यांनीएका रेडिओ वाहिनीशी बोलताना दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post