मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं; फडणवीसांचा पवारांना टोला


वेब टीम : मुंबई
गेल्या १० ते १५ वर्षांपासून सर्कशीत प्राण्यांवर बंदी आहे. आता सर्कस ही विदूषकांच्या भरवशावरच चालते हे पवार साहेबांना माहिती नसावे.

कारण पवार हे आता सर्कशीच्या टचमध्ये नव्हते. म्हणून त्यांना याबाबतची माहिती नसावी.

मात्र राजनाथ सिंह यांना सर्कस कशाच्या भरवशावर चालू शकते हे माहीत असल्याने त्यांनी हे विधान केले आहे.

आता पवारांनी काय समजायचे ते समजावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. ते एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत. त्याचबरोबर सर्कसमध्ये विदूषकाची कल्पना आहे; पण विदूषकाची कमी आहे. ” असा टोला शरद पवार यांनी लगावला होता.

त्यांच्याविधानावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विदर्भामधला आहे. त्यामुळे समुद्राशी काहीही संबंध नाही, असं शरद पवार म्हणाले आहे.

पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.

शरद पवार माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं, म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

तसेच शरद पवरांना माझ्या खांद्यावरून वांद्र्याचे सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअर यांच्यावर बंदूक चालवायची आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post