शत्रूचा माग काढून होणार अचूक 'प्रहार'; शक्तिशाली राफेल भारतात दाखल..


वेब टीम : अंबाला
प्रचंड वेगाने शत्रूचा माग काढून अचूक वार करणारे राफेल हे लढाऊ विमान अखेर भारतात उतरले. 

एकाच वेळी वेगवेगळी कामे करण्याच्या क्षमतेमुळेच ‘राफेल’ भारतीय हवाई दलाचे शक्तिशाली विमान ठरणार आहे. 

गेली दोन-तीन वर्षांपासून ज्याची चर्चा होती, ते लढाऊ विमान राफेल आज भारतात उतरले.

राफेलची तुकडी हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच, नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या.

यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौके बरोबर संपर्क साधला.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. 

फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. 

संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. 


राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. 

राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी भारतीय वायू दलाचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित केले आहे. 

उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरले. 

२० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

भारतीय वायू दलाच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

भारताने फ्रान्सबरोबर २०१६ साली अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. 

पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात आली आहेत. लवकरात लवकर या विमानांच्या वापराबाबत निर्णय होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post