राज्यात दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन लवकरच झाडाला धडकणार..


वेब टीम : औरंगाबाद
पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा खोचक टोला रावराहेब दानवे यांनी शरद पवारांना लगावला. 

आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

औरंगाबाद शहरात शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झालं. 

दरम्यान, कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला जोरदार सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. 

पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा खोचक टोला रावराहेब दानवे यांनी पवारांना लगावला. 

आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टोलेबाजी केली. 

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोघांच्या ( शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) हातात आहे. 

आणि तिसरा पार्टनर काँग्रेस मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, अशी सूचना करत आहे. 

दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन लवकरच झाडाला धडकणार आहे. 

विशेष म्हणजे यांच्याकडे परवाना नाही की इन्शुरन्स सुद्धा नाही, अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post