राफेलच्या येण्याने चीनला कदाचित कोणतीही चिंता वाटणार नाही.. ते आपल्या पुढे..


वेब टीम : मुंबई
भारताने ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. 

त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ विमाने आज भारताला मिळाली. 

पण राफेलच्या हवाई दलात सामील होण्याने चीनची चिंता वाढेल, असे वाटत नसल्याचे खासदार शरद पवार यांनी एका वृत्त वहिनीच्या मुलाखतीत बोलताना म्हंटले आहे.

भारताने हवाई दलात राफेल विमान सामील केली ही नक्कीच चांगली बाब आहे. 

राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही. 

तसेच राफेलच्या येण्याने चीनला कदाचित कोणतीही चिंता वाटणार नाही. 

ते आपल्यापासून खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. 

आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post