बॉलिवूडचा शहेनशहा अखेर कोरोनामुक्त...


वेब टीम : मुंबई
महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. अमिताभचा मुलगा अभिषेक याने ट्विट करून ही माहिती दिली.

‘माझ्या वडिलांची नुकतीच कोव्हिड-१९ चाचणी निगेटिव्ह आली आहे. ते लवकरच घरी असतील. तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेसाठी आभार.’ असे ट्विट अभिषेकने केले आहे.

याआधी अमिताभ यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चन आणि नात आराध्या यांचादेखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे.

अमिताभ यांना ११ जुलैला रात्री श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाचे निदान झाले होते. त्यानंतर अभिषेक बच्चनचा रिपोर्टही ‘पॉझिटिव्ह’ आला होता. 

नंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली होती. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट ‘पॉझिटव्ह’ आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला होता.

अमिताभ, ऐश्वर्या व आराध्या या तिघांचीही कोरोना टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. अभिषेक मात्र अद्यापही रुग्णालयात आहे.

 ‘दुर्दैवाने मी अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह आहे. मात्र मीसुद्धा कोरोनाला हरवून लवकरच घरी परतेन. पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनांसाठी धन्यवाद.’ असे अभिषेकने ट्विटमध्ये म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post