सुशांतसिंह राजपुतचा बळी कुणी घेतला..? आशिष शेलारांनी दिली 'हिंट'वेब टीम : मुंबई
नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच ‘ड्रग-पब अँड पार्टी’ गँगने सुशांत सिंह राजपूतचा बळी घेतला, असा टोमणा भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला मारला आहे. 

शेलार यांचे पूर्ण ट्विट आहे – नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच ‘ड्रग- पब अँड पार्टी’ गँगने सुशांत सिंह राजपूतचा बळी घेतला.

या ‘ड्रग-पब-पार्टी’ टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? 

#ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरेही समोर येतीलच!! न्याय होईल! 

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे हे काही वर्षांपासून मुंबईत ‘नाईटलाईफ’ क्लब, पब, बाजार सुरू करण्याचे जोरदार समर्थन करत आहेत. यासाठी त्यांच्यावर बरीच टीका झाली.

अभिनेता सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण आत्महत्या म्हणून गुंडाळण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. सुशांतच्या मृत्यूनंतर ६५ दिवसांत मुंबई पोलीस चौकशीत काहीच शोधू शकले नाही. 

त्यांनी याबाबत एफआयआरही नोंदवला नव्हता! दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी होत असताना राज्य सरकार सतत त्याला विरोध करत होते. 

सुशांतच्या वडिलांनी पाटणा (बिहार) येथे या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

मात्र, चौकशीसाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या पोलिसांना विलगीकरणात कोंडून मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास बंद पाडला ! नंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. 

न्यायालयाने याची चौकशी सीबीआयकडे दिली. आता सीबीआयच्या चौकशीत रोज या प्रकरणात खळबळजनक माहिती उघड होते आहे. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी उल्लेखित ट्विट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post