'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..


वेब टीम : बीजिंग
कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे.

त्यामुळे बीजिंग मास्कमुक्त झाले आहे.

बीजिंगमध्ये १३ दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचा दावा स्थानिक आरोग्य विभागाने केला आहे.

मात्र, तरीही नागरिक शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मास्कसह घराबाहेर पडल्याचे दिसून आले.

मास्क वापरल्यामुळे सुरक्षित वाटत असल्यामुळे मास्क वापरणे टाळता येणार नसल्याचे अनेकांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post