.. तर काँग्रेस पक्ष पुढील ५० वर्षे विरोधीपक्षच राहील... जेष्ठ नेत्याने टोचले कान..वेब टीम : दिल्ली

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 


कॉंग्रेस कार्यकारिणीसह पक्ष संघटनेतील प्रमुख पदांसाठी निवडणुका झाल्या पाहिजेत, असं त्यांनी पुन्हा सांगितलं. 


निवडणुकांना जे विरोध करत आहेत त्यांना आपलं पद जाण्याची भीती आहे. 


निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत कारण नियुक्त केलेल्या काँग्रेस अध्यक्षाला एक टक्का पाठिंबादेखील पाठिंबा मिळणार नाही. 


निवडलेल्या कार्यकारिणीने पक्षाचे नेतृत्व केले तरच पक्ष संघटनेची स्थिती चांगली असेल. 


अन्यथा कॉंग्रेस पुढील ५० वर्षे विरोधी पक्षातच बसेल राहील, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.


गेल्या कित्येक दशकांपासून पक्षात निवडून आलेल्या समित्या नाहीत. आपण १०-१५ वर्षांपूर्वीच निवडणुका घ्यायला हव्या होत्या. 


यामुळे आपला एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होतोय. 


आपल्याला सत्तेत परतायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पक्षाला बळकट करावं लागेल. 


पुढची ५० वर्षे पक्षाला विरोधी पक्षातच बसवायचे असेल तर मग पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची गरज नाही, असं आझाद म्हणाले.


आपली कोणतीही वैयक्तीक महत्त्वाकांक्षा नाही. आपण एकदा मुख्यमंत्री झालोय, केंद्रीय मंत्री, सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षात सरचिटणीस झालोय. 


मला स्वत: साठी काहीही नको आहे. पुढील ५ ते ७ वर्षे मी सक्रिय राजकारणात राहीन. 


मला पक्षाध्यक्ष व्हायचे नाही. खऱ्या काँग्रेस कार्यकर्त्या प्रमाणे पक्षाच्या हितासाठी निवडणुका हव्या आहेत, असं आझाद यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post