आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव... 'या' संघातील १२ जण पॉझिटिव्हवेब टीम : दिल्ली
युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जण कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. 

कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. 

यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसलाय.

राजस्थान, पंजाब या संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. 

दुबईत सीएसके संघाचा क्वारंटाईन कालावधी शुक्रवारी संपणार होता. 

त्यानंतर सीएसकेचे खेळाडू सरावाला सुरुवात करु शकणार होते. 

मात्र, संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. 

त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वारंटाईन कालावधी आणखी आठवडाभरासाठी वाढवण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार दुबईत आल्यानंतर प्रत्येक संघाच्या खेडाळू आणि सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी तीन वेळा करणं अनिवार्य आहे. 

दुबईत येण्याआधी भारतात प्रत्येक खेळाडू आणि कर्मचाऱ्याची पाचवेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post