मध्यप्रदेशात काँग्रेस भाजपला मोठा झटका देण्याच्या तयारीत...?वेब टीम : भोपाळ
मध्य प्रदेश विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत. 

त्या २७ जागांवर आता पोटनिवडणूक होणार आहे. 

पोटनिवडणुकीच्या तारखाही लवकरच जाहीर होतील. 

लवकरच निवडणूक आयोग त्या जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्ष आणि कांग्रेस साठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची आहे. 

कारण, या २७ जागांच्या निकालांवर मध्यप्रदेशच्या सत्तेत कोण राहणार याचा निर्णय होणार आहे. 

या २७ जागांच्या जीवावर पुन्हा सरकार पलटी होण्याची शक्यता मध्यप्रदेशात निर्माण झाली आहे. 

भाजपला सत्तेत राहण्यासाठी २७ पैकी ९ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. 


यापेक्षा कमी जागा मिळाल्यास त्यांची सत्ता जाऊ शकते. काँग्रेससाठी ही निवडणुक मोठे आव्हान घेऊन आली आहे. 

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी ही पोटनिवडणुक खास आव्हानात्मक आहे.

 कमलनाथ यांना स्पष्ट बहुमत मिळवायचे असल्यास सर्व २७ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे.

राज्यात एकूण २३० विधामसभेच्या जागा आहेत. त्यापैकी २७ जागा रिक्त असून उर्वरित २०३ विधानसभा सदस्य असलेल्या विधानसभेत भाजप सत्तेत आहे. 

सध्याच्या आकडेवारींनुसार भाजपकडे १०७ सदस्य असून बहुमतापेक्षा जास्तीच्या ५ सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. 

तर, या विधानसभेत काँग्रेसकडे ८९ सदस्य आहेत. पोटनिवडणुक झाल्यास काँग्रेसला बहुमत सिद्ध करायचे झाल्यास एकूण ११६ सदस्यांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. 

त्यासाठी त्यांना सर्व २७ जागांवर विजय मिळवावा लागेल. परंतु, पोटनिवडणुकीनंतर भाजप स्पष्ट बहुमतांपर्यंत पोहोचली नाही. 

तर, काँग्रेस पुन्हा समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष उमेदवारांच्या सहाय्याने राज्यात सरकार स्थापन करू शकते.

आकड्यांचा खेळ पाहिल्यास कमलनाथ मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठा झटका देऊ शकतात. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post