चीनचा भामटा भारतात चालवायचा हवाला रॅकेट... गुन्हा दाखल...


वेब टीम : दिल्ली

बनावट किंवा संशयास्पद कंपन्यांचा वापर करून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा हवाला रॅकेट चालविल्याबद्दल चिनी नागरिकाविरुद्ध प्रवर्तन निदेशालयाने (ईडी)  मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 


सोमवारी ही माहिती अधिका-यांनी दिली.


अधिका-यांनी सांगितले की, केंद्रीय एजन्सीने ४२ वर्षीय चार्ली पेंग ऊर्फ लुओ सॉन्ग याच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या (पीएमएलए) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


चार्ली पेंग हा या रॅकेटचा रिंग लीडर असल्याचे म्हटले जात आहे.


प्राप्तिकर विभागाने १२ ऑगस्ट रोजी पेंग आणि त्याच्या साथीदारांवर छापे टाकले. गुरुग्राममधील पेंगच्या परिसरासह किमान दोन डझन जागांवर आयकर अधिका-यांनी छापा टाकला.अधिका-यांनी सांगितले की, पेंगविरोधात फौजदारी, सावकारी गुन्हा दाखल करण्यापूर्वी ईडीने आयकर विभागाच्या पुरावा आणि कारवाईचा आणि पेंगविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या स्पेशल युनिटच्या एफआयआरची दखल घेतली होती.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेंग याच्यावर बनावट भारतीय पासपोर्ट असल्याचा आरोप आहे आणि त्याने चीनकडून पैसे वळविण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांत कंपन्यांचे जाळे तयार केल्याचे आयकर विभागाच्या अधिका-यांनी म्हटले आहे. अधिका-यांनी सांगितले की, दिखाव्यासाठी ते वैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक वस्तू व काही अन्य वस्तूंची आयात व निर्यात करणे हा आहे.


पेंगची सध्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांव्यतिरिक्त प्राप्तिकर विभागाकडून विचारपूस केली जात आहे. 


सूत्रांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सप्टेंबर २०१८ मध्ये फसवणूक आणि बनावटपणाच्या आरोपाखाली पेंग याला अटक केली होती आणि बेकायदेशीर ‘मनी चेंजर’ चालवत असल्याचा आरोपदेखील सूत्रांनी केला आहे. 


मणिपूर येथील एका महिलेशी लग्न करून पेंगने राज्यातून बनावट भारतीय पासपोर्ट घेतल्याचा आरोपही केला जात आहे. 


त्याच्याविरुद्ध छापेमारी दरम्यान काही बनावट आधार कार्डेही जप्त केली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post