थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा केला अवमान... अन् दंड झाला अवघा एक रुपया...वेब टीम : दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला. 


प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. 


या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते.


 या प्रकरणी आज शिक्षा सुनावताना प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला. यानंतर प्रशांत भूषण यांनी लगेचच एक ट्विट केले.


प्रशांत भूषण यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले वकील आणि ज्येष्ठ सहकारी राजीव धवन यांनी एक रुपयाचे योगदान दिले असून आपण ते तात्काळ स्वीकारले असल्याचे म्हटले.


सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांनी १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास सांगितला. 


दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास तसेच तीन वर्षांकरिता वकिली करण्यापासून रोखले जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 


न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post