तब्येत बरी आहे ना?, एकनाथ शिंदेंनी घेतली कोरोनाग्रस्त शिवसैनिकाची भेट


वेब टीम : ठाणे
मागील अनेक दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था संघटना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यात शिवसेनेचाही समावेश आहे.

अनेक शिवसैनिक पुढे येऊन गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, यात त्यांना कोरोना संसर्ग होत असल्याच्याही घटना घडत आहेत.

कल्याण डोंबिवलीमधील कोरोना बाधित शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट पीपीई किट घालून उपचार घेत असलेल्या शिवसैनिकाची भेट घेतली.

सध्या केडीएमसीचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि महानगर प्रमुख विजय साळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

विजय साळवी यांच्यावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय साळवी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

स्वतः एकनाथ शिंदे चौकशीला आल्याने आणि औषधोपचाराची व्यवस्था केल्याने साळवी यांनाही भरुन आलं.

साहेब तुम्ही सर्व सामान्य शिवसैनिकासाठी इथपर्यंत आलात, लाखोंची औषधे दिली. खूप बरं वाटलं, अशी भावना विजय साळवी यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post