राहुल गांधींचा आरोप... काँग्रेसच्या 'या' नेत्यांचे भाजपशी साटेलोटे...


वेब टीम : दिल्ली

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज कॉंग्रेस कार्यकारी समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. 


यामध्ये पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी  यांनी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 


नवीन पक्षाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना त्यांनी सदस्यांना केली आहे. 


या बैठकीच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेसच्या ज्या २३ नेत्यांकडून सोनिया गांधींना पत्र लिहिण्यात आलं होतं त्या सर्व नेत्यांवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 


हे सर्व नेते हे भाजपशी एकरूप असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.


सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांना राहुल गांधी यांनी चांगलेच सुनावले आहे. 


ते म्हणाले की, जेव्हा पक्ष राजस्थान आणि मध्यप्रदेशात विरोधी शक्तींशी लढत होता त्यावेळी सोनिया गांधी अस्वस्थ होत्या. 


तेव्हा असं पत्र का नाही लिहिलं गेलं? राहुल गांधींच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post