उगाचच अर्धवट माहितीच्या आधारावर रियावर टीका करु नका....वेब टीम : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. 


या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. 


परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. 


मात्र ही टीका अभिनेत्री हिना खानला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. 


“पुराव्यांअभावी अशी टीका करु नका त्यामुळे तिचं करिअर संपून जाईल”, असं मत हिनाने व्यक्त केलं आहे.


पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हिनाने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 


त्यामुळे खरी माहिती बाहेर येईपर्यंत थोडी वाट पाहा. उगाचच अर्धवट माहितीच्या आधारावर रियावर टीका करु नका. 


जर तुम्हाला मतं मांडायचीच असतील तर तटस्थपणे मांडा. अशी आक्षेपार्ह टीका करु नका. 


अशा प्रकारच्या मीडिया ट्रायलमुळे रियाचं करिअर संपून जाईल. 


बोलण्यासाठी देशात करोना विषाणू, स्त्रीयांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, शिक्षण, भ्रष्टाचार असे अनेक विषय आहेत. त्यावर देखील व्यक्त व्हा.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post