संदीप सिंह भाजपच्या कोणत्या नेत्याच्या संपर्कात होता..?वेब टीम : दिल्ली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी चित्रपट निर्माता संदीप सिंहवरून काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


फडणवीस यांच्यासोबत संदीप सिंह याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. 


यावरून संदीप सिंह याला कोण वाचवत आहे? 


असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपला लक्ष्य केले.


आपण सुशांतसिंह राजपूतचे जवळचे मित्र आहोत, असा दावा संदीप सिंह याने अनेकदा केल्याचे सिंघवी म्हणाले. 


याच संदीप सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवला होता. 


याचाच अर्थ संदीप सिंह ही एक अतिशय जवळची व्यक्ती आहे. 


त्या चित्रपटाच्या पोस्टर्सचे लोकार्पण सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 


याच संदीप सिंहने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र भाजप कार्यालयात 53 कॉल केले होते? कोण आहे तो नेता?, 


माननीय फडणवीस आणि गडकरी यांनी हे सांगावे,’असे प्रश्नही सिंघवी यांनी विचारले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post