काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी वाढल्या... उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता..


वेब टीम : दिल्ली

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, पक्ष नेतृत्वा संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्रात केली आहे.


काँग्रेस कार्यकारिणीतील बड्या नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. त्यात बैठकीत नेतृत्वबदलाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तात्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. 


त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या प्रभावी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारी होती. सोनिया गांधी यांचे वय 73 आहे. 


त्यामुळं प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास, उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 


परंतु, गेले वर्षभर सोनिया गांधी पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली. 


विशेषतः राजस्थानमधील पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पक्षातील बदलाविषयी चर्चा झाली होती. 


त्यात राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी पक्षाच्या स्ट्रॅटेजीविषयी काही स्पष्ट मतं व्यक्त केली होती. 


पक्षातील काही नेते विशेषतः तरुण नेते, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यासाठी आग्रही आहेत. 


पक्षाच्या विविध पातळ्यांवर राहुल यांच्या नेतृत्वासाठी आग्रह करण्यात येत आहे. 


पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ तरुण नेतेच नव्हे तर, ज्येष्ठ नेतेही पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. 


त्यामुळेच जेष्ठ नेत्यांनी तसेच, आमदार, खासदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्वाविषयी फेरविचार करण्याची विनंती केलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post