घर खरेदी करायचं आहे... मग राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय.. होणार फायदा..वेब टीम : मुंबई
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम उद्योगाला व नवे घर घेणार्‍यांसाठी सरकारने खूषखबर दिली आहे. 

नवीन घराच्या खरेदीसाठी लागणारे 5 टक्के मुद्रांक शुल्क कमी करून 2 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

गृह खरेदी खतासाठी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 2 टक्के, तर 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीत 3 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.

कोराना आणि त्यामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. 

बांधकाम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यातच या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. पगार कपातही झाली. 

साहजिकच आधीच मेटाकुटीला आलेल्या बांधकाम क्षेत्रातही मंदी आली आहे. 

घर खरेदी करणार्‍यांची संख्या खूपच कमी झाली आहे. स्टॅम्प डयुटी कमी केल्याने साहजिकच या क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. 

बांधकाम व्यवसायाला गती मिळेल, अशी आशा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post