कंगना अशी का वागत आहे? धनंजय मुंडे यांनी सांगितली 'ही' दोन कारणे...वेब टीम : मुंबई
आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते असे बोलल्या नंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगनामध्ये शाब्दिक वार पाहायला मिळाले ते अद्याप थांबलेले नाही. 

कंगना रनौत एवढ्यावरच थांबली नाही तर, मुंबई ही पाकव्यात काश्मिरसारखी वाटते असेही तीने म्हटले. 

मुंबईला भले बुरे म्हणणा-या कंगनाला बॉलिवूडकरांनीही चागलेच खडसावले.

एवढेच नाही तर, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही कंगनाला खडसावले आहे. 

तुमच्या सारख्या अनेकांना याच मुंबईने आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. 

एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते. 

एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते,” अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post