फडणवीसांचं ठरलं... ठाकरे सरकार पाडण्यासाठी काढणार मुहूर्त...वेब टीम : मुंबई
भाजप नेते आणि राज्यसभा खासदार राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यानंतर आज खासदार गोपाळ शेट्टी यांनीही फडणवीस लवकरच परत एकदा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांना लगावला. 

दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांना गदा भेट दिली. 

यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, याचा प्रहार फक्त कोरोनाच्या लढाईसाठी करणार आहे. 

सध्या आमच्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाई महत्वाची असून सत्तेत येणं हा आमच्यासाठी महत्वाचा विषय नसल्याचे म्हणत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कोरोना काळात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. 

हे सरकार लवकरच जाईल, असा दावा नारायण राणे यांच्यासह भाजपचे इतर नेते वारंवार करत होते. 

मात्र आता फडणवीस यांनीच कान टोचल्यानंतर तरी हे नेते याबाबतचं भाष्य करणं टाळणार का, हे पाहावं लागेल .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post