चीनचे लष्कर आले भारतीय लष्कराच्या टप्प्यात... ६ टेकड्यांवर मिळविला ताबा...वेब टीम : दिल्ली

सीमेवरील तणाव निळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये राजकीय पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी चिनी सैन्याच्या हालचाली सुरूच आहे. 


भारताचे लष्करही सावध असून चिनी लष्कराला चोख उत्तर देते आहे. भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या आणखी ६ टेकड्याचा ताबा घेतला आहे. 


ANIने हे वृत्त दिले आहे. या टेकड्या लडाखच्या पूर्व भागातल्या आहेत. यामुळे चिनी लष्करावर अंकूश ठेवणं शक्य होणार आहे. 


याआधी पॅंगॉंग सरोवर परिसरात भारताच्या लष्कराने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या काही टेकड्याही ताब्यात घेतल्या आहेत.


या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. 


चीन तिथे पोहचण्याआधीच भारतीय सैन्याने या टेकड्या ताब्यात घेतल्या. २९ ऑगस्ट पासून याबाबतची कारवाईला सुरू करण्यात आली होती. 


१५ सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेण्यात आल्यात.


मगर हील, गुरूंग हील, रिसेहेन ला, रेझांग ला, मोखापरी आणि फिंगर – ४ जवळची आणखी एक टेकडी, अशा सहा ठिकाणी आता भारतीय जवानांचा ताबा आहे. 


युद्धाचा प्रसंग आलाच तर भारतीय सैन्याला उंचावरून मारा करणे सोपे होईल, असे संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.


काही दिवसांपूर्वीच चीनच्या टेहाळणी नौका भारतीय युद्ध नौकांवर लक्ष ठेवत असल्याची घटना उघड झाली होती. 


चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परिसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते. 


हे भारतीय नौदलाच्या लक्षात येताच चीनची नौका परत गेली.


इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत.


 ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही घटना गंभीर आहे.


 ही घटना भारतीय नौदलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत चीनला सूचक इशारा दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post