जलयुक्त शिवार योजना ठरली 'मुंगेरीलाल के हसीन सपने'...वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार आणि हिंदीतील बाईट या दोन मुद्यांवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. 

कॅग'च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या सर्व आश्वासनांप्रमाणे जलयुक्त शिवार योजनाही 'मुंगेरीलाल के हँसीन सपने'सारखीच ठरली आहे. 

विरोधी पक्षात असताना जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार नाही यात मोठा भ्रष्टाचार आहे असे आम्ही वारंवार सांगत होतो. 

मात्र जाहिरातीच्या जोरावर खोटा प्रचार केला जात होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते की भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी?

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ? असा खोचक सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. 

महाराष्ट्रातील विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीतून टीका केली. 

पाटील यांनी टवीट करुन 'विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ? असा प्रश्न उपस्थित केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post