एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का..? चंद्रकांत दादा म्हणाले...वेब टीम : कोल्हापूर
भारतीय जनता पक्षातील नाराज नेते एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा नेहमी असतात. 

पण एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीचे जुने, जाणते नेते आहेत. 

त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नुकसान होईल," असा निर्णय ते कधीही घेणार नाहीत," असे मत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

राज्यसरकारने मंजूर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्यभरातला मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

रस्त्यावर उतरला आहे. पण मराठा समाजाचे नुकसान होऊ नये, म्हणून मंगळवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाचे मी स्वागतच करतो, पण या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला हवे. 

जेवढे सरकार संवेदनशीलपणे निर्णय घेईल. त्याची तितक्‍याच संवेदनशीलतेने अंमलबजावणी होईल की नाही, हे कठीण असते. 

त्यामुळे मराठा समाजासाठी दिलेल्या सवलतींच्या अंमलबजावणीकडेही लक्ष द्यायला हवे. 

अंमलबजावणीतील सर्व अडथळे दूर करायला हवेत," असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post