गोरगरिबांच्या वाल्याला झाला कोरोनाचा संसर्ग... बच्चू कडू पॉझिटिव्ह...वेब टीम : अकोला

राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली.


टविटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला असूनन माझा्या संपर्कात आलेल्यां सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्या असे बच्चू कडू यांनी कळकळीने सांगितले आहे.एखाद्या अभिनेत्याचे चाहते असावे तसेच राज्यात बच्चू कडूचा एक वेगळा मोठा चाहता वर्ग आहे. 


आपल्या नेत्याचे कोरोना झाल्याचे ट्विट पाहताच त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.


तर, एक जण म्हणतात, संपर्कात तर आसूड यात्रेदरम्यान आलो होतो.


वाण नाही पण गुण नक्की लागलाय तुमचा.किती ती तळमळ शेतकऱ्यांसाठी. 


तुमच्यासोबत सिएम टू पिएम् , नागपूर ते वडणगर ची संघर्ष आसूड यात्रा, माझ्या आयुष्यातील अविस्मणीय असे १३ दिवस होते ते. आता थोडा आराम करा भाऊ.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post