'उद्धव ठाकरे, कल तेरा घमंड तुटेगा...' : कंगनाची जीभ घसरली...वेब टीम : मुंबई

आजचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरत आहे. 


शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिल आहे.

 

आज कंगना रणौत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. 


याच पार्श्वभूमीवर सुडबुद्धीच्या राजकारणाने कंगनाचे कार्यालयावर कारवाई केली जात असल्याचे आरोप आता शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर होत आहे. 


तर, खुद्द उच्च न्यायालयाने देखील या कारवाईला स्थगिती दिली आहे.


यानंतर, काही वेळापूर्वी मुंबईतील घरी पोहोचल्यानंतर कंगना रणौतने एका व्हिडिओमध्ये थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं असून त्यांचा एकेरी उल्लेख देखील केला आहे. 


तसेच, ‘आज मेरा घर टुठा हैं, कल तेरा घमंड टुटेगा‘ असं म्हणत थेट आव्हान दिलं असल्याने आता हा वाद चांगलाच पेटला आहे. 


आता हा सामना माझ्यासोबत घेतला असून मला देखील चांगली संधी मिळाल्याचे मत कंगनाने या व्हिडिओतुन व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post