मराठा आरक्षणावर शरद पवारांनाच प्रश्न विचारले पाहिजेत...

file photos


वेब टीम : मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण ढवळून निघाले आहेत. 


सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहे. 


अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 


उदयनराजे भोसले यांनी टीव्ही-९ मराठीशी बोलताना सर्वच मुद्द्यावरून निर्भीडपणे आपली भूमिका स्पष्ट केली.


आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातमोठा संताप व्यक्त केला जात आहे. 


त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न निकाली काढला गेला नाही नाही तर १८५७ प्रमाणे क्रांती होईल आणि लोक बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावून टाकेल. 


नेत्यांना मारुन टाकतील, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. 


तसेच शरद पवार यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर मला भाष्य करायचं नाही. अशी स्पष्टोक्ती उदयनराजे भोसले यांनी दिली.


उदयनराजे भोसले म्हणाले, शरद पवार वयाने ज्येष्ठ आहेत आणि माझ्यासाठी आदरणीय आहेत. 


माझ्याआधी शरद पवार जन्माला आलेत, ते माझ्या वडिलांसारखे आहेत. 


त्यामुळे शरद पवार यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर मो बोलू शकत नाही. 


मी काही सांगकाम्या नाही, कुणीही सांगायचं आणि मी ऐकायचं. अशी माझी आणि माझ्या घराण्याची ख्यातीही नाही. 


कोर्ट वगैरे ठिक आहे, त्यांचा अवमान करत नाही पण तेही माणसं आहेत, त्यांनीही विचार करायला पाहिजे. 


शरद पवार राजकारणातील सर्वात ज्येष्ठ आहेत. मराठा आरक्षणावर त्यांनाच प्रश्न विचारले पाहिजेत. असे उदयनराजे म्हणाले.


खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगिती का मिळाली याच्या खोलात मला जायचं नाही. 


पण कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये. समाज म्हटलं की वेगवेगळ्या जातीजमातीची लोकं असतात.


मराठा समाजावर का अन्याय होतोय? उद्या लोक प्रश्न विचारायचं सोडून देतील आणि काय करतील मला सांगता येत नाही. 


मागे जे मार्चे निघाले ते शांततेत निघाले, आता जे मोर्चे निघाले ते शांततेत निघणार नाही. 


त्याचा परिणाम स्वतःला फार मोठा पक्ष समजणाऱ्या पक्षांना समजेल. लोक काय करतील मी सांगू शकत नाही.


सध्या लोकशाही आहे. राजेशाही असती तर दाखवलं असतं. माझं एकच म्हणणं आहेअन्याय होत असे तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागायला हवं. 


लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून जाता, तेवढं भान ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. 


नाहीतर आणा राजेशाही, मग मी दाखवतो, काय करायचं, काय नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post